संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
40 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
निस्वार्थ मदत फाउंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम
(दखनी स्वराज्य, अक्षय दहिफळे)
चांगतपुरी : अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त हाेते. म्हणून पिंपळवाडी येथील निस्वार्थ मदत फाउंडेशन तर्फे पितृछत्र हारवलेल्या व गरजुवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासात आली. यावेळी माऊली हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ राम लोंढे, पोलीस अधिकारी गणेश खंडागळे, राहुल मोहतमल, रावसाहेब थोटे, कल्याण सरग यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.राम लोंढे यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठु शकतो. आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत यश संपादन करा असे मत व्यक्त केले.
विद्यार्थी बहुतांश वेळा शाळेतीलच असतात. गरीब विद्यार्थ्यांकडे काहीसे दुर्लक्ष हाेते. ही बाब लक्षात घेऊन निस्वार्थ मदत फाउंडेशनने वयाची वा शिक्षणाची अट न ठेवता ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे, त्याला मदतीचा हात देण्याचा ध्यास घेतला आहे. यात पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
पिंपळवाडी येथील काही तरुणांनी सुरू केलेल्या या निस्वार्थ मदत फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अपघात ग्रस्त व्यक्ती, अनाथ गरजूंना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, अंध अपंगांना मदत, अनाथ आश्रमात जाऊन वाढदिवस साजरे करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांनंतर आता शैक्षणिक मदत हा उद्देश डाेळ्यासमाेर ठेऊन अडलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे आदर्श कार्य या युवकांनी हाती घेतले आहे. यात शैक्षणिक साहित्य दिले जात आहे. शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित हाेते.
------------------------------------------------
विद्यार्थ्यांनी जिज्ञासा,धैर्य, एकाग्रता,संयमाने यश संपादन करावे - डॉ.राम लोंढे
विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे
स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चित यश प्राप्त होईल. घर व परिसर आपला स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. स्वच्छतेचे आणि व्यसनमुक्तीचे दूत म्हणून विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे असेही डॉ. राम लोंढे यांनी यावेळी सांगितले
------------------------------------------
निस्वार्थ मदत फाउंडेशन कार्य कौतुकास्पद - गणेश खंडागळे
निस्वार्थ मदत फाउंडेशन कार्य कौतुकास्पद आहे. आज पर्यंत त्यांनी केलेल्या कार्यांत इतर प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य करत आणखीन जोमाने कार्य करावे असे मत एम आय डी सी चे बीज जमादार गणेश खंडागळे यांनी व्यक्त केले.