संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्याची पालक सभेत निवड करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी अप्पासाहेब कांबळे तर उपाध्यक्षपदी नंदू पुसावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच संग्रामसिंग पवार, मोहम्मद शेख, भरत पवार, अर्जुन जाधव, धरमसिह परिहार, सौ.किरण चव्हाण, सौ.कावेरी आनंदे, सौ.राधा ठोंबरे, सौ.अनिता उगले, सौ.संगिता चव्हाण शिक्षणप्रेमी म्हणून प्रदिप जोशी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून पांडुरंग धोंडगे यांची निवड करण्यात आली. या पालकसभेला अध्यक्ष म्हणून माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांता शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच भरत काळे पोलिस पाटील भगवान जाधव गावकरी रामेश्वर चोरमले, सुनील मस्के, बाबासाहेब ठोंबरे, भास्कर थोरात, अस्लम शेख, शरदसिंग पवार, अशोक पांढरे, संभाजी मोटे, रामेश्वर मस्के, शिक्षक सुनील हेलवाडे, आप्पासाहेब उगले, देविदास नागरगोजे, दिलीपकुमार खराद, ज्ञानेश्वर पवार, वैभव पवार, श्रीमती अनिता गावडे, मनिषा चव्हाण व उषा कोळेकर आदी उपस्थित होते.