संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंगाचा वार्षिक आषाढी महोत्सव येत्या दि.17 जुलै रोजी संपन्न होत आहे. आषाढी वारी निमित्त श्रीक्षेञ पैठण येथेही नाथसमाधी दर्शनासाठी दरवर्षी जवळपास पाच लाख वारकरी/भाविक येत असतात. भल्या पहाटेपासुन वारकरी, भाविक वर्ग गोदावरीत स्नान करून दर्शनासाठी जातात. सद्य परिस्थितीत माञ गोदावरी पाञात पुरेसे पाणी नसल्यामुळे दि.12 जुलैपुर्वी नाथसागरातुन पुर्ण क्षमतेने पाणी सोडून पाञ भरुन घेणे आवश्यक आहे. तशा आशयाची मागणी प्रतिसाद संघटनेने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा खासदार संदिपान पाटील भुमरे यांच्याकडे दि.05 जुलै शुक्रवारी पैठण येथे आले असता एका निवेदनाद्वारे केली. त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात विष्णू ढवळे, रामचंद्र आहुजा, नानक वेदी, दिनेश पारीख, विष्णू म.गायकवाड, महेश पराड, नारायण म.साळुंखे, गणेश जुंजे, भाऊसाहेब पठाडे, राजेंद्र बडसल आदी सहभागी होते. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना या विषयात तातडीने लक्ष्य घालत असल्याचे खासदार भुमरेंनी शिष्टमंडळास सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी वारीत वारक-यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या बाबीची गंभीर दखल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता नाथसागर प्रकल्प यांनी घेऊन गोदावरी पाञात तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी विविध संघटनांनी सुद्धा केलेली आहे.