संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
गोल्डन रॉक्स शाळेत 78 स्वातंत्र्यदिन साजरा
दै.दखनी स्वराज्य/पैठण
विश्वात्मा फाउंडेशनच्या गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चिंतामणी ट्रेडिंग कंपनीचे मालक राहुल प्रमोद पाटनी उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठान कॉलेजच्या व्याख्याता स्वाती सालुंखे आणि निवृत्त प्रा. सतीश सराफ यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री पाटनी आणि मुख्याध्यापिका ए. मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत यांचे सादरीकरण झाले. पूर्व प्राथमिकच्या मुलांनी सुंदर नृत्य सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी भाषणं केली.क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी गोगटे आणि बी. बी. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राजक्ता गोसावी, पूजा पवार, सुनिता पटेल आणि महेश गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शना नंतर विनोद मुंदडा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.