संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
हळदाच्या नागरिकांचा जरांगे पाटील यांच्या 13 जुलैच्या महासंवाद रॅलीत शतप्रतिशत सहभागाचा निर्धार
दखनी स्वराज्य, सिल्लोड -
सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या 13 जुलै 2024 रोजी होणाऱ्या महासंवाद रॅलीसाठी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे या नियोजनासाठी बुलंद छावा संघटनेचे पदाधिकारी तथा मराठा समन्वय बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे काका, बुलंद छावा प्रदेश कार्याध्यक्ष सतीश वेताळ पाटील, प्राध्यापक चंद्रकांत भराट सर, संजय तायडे सर, संदीप जाधव, राधाकृष्ण काकडे पाटील, अनिल पालोदे, विजय काकडे पाटील, संजय नाकीरे, संजय शेळके, हळदा येथील बुलंद छावाचे चे सिल्लोड सोयगाव तालुका अध्यक्ष विनोद बगळे पाटील, तालुका उपाध्यक्ष कृष्णा मोझै पाटील, तालुका कार्याध्यक्ष भगवान बगळे पाटील, कृष्णा जाधव पाटील मराठा समन्वय, सुभाष जंजाळ पाटील मराठा समन्वय, ओंकार बगळे आदींची उपस्थिती होती.