संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
हेलपाटाकार तानाजी धरणे युवाध्येय आयडाॅल पुरस्काराने सन्मानित
दखनी स्वराज्य, अहमदनगर -
दि. 21 जुन 2024 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त समर्थ ऋग्वेद भवन अहमदनगर येथे युवा ध्येय समुह अहमदनगर यांनी घेतलेल्या शानदार पुरस्कार वितरण समारंभात साहित्यिक तानाजी धरणे यांना त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन "युवा ध्येय आयडाॅल " हा मानाचा पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरु सर्जेराव निमसे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षक नेते नारायणराव पिसे यांनी तो सन्मानपुर्वक स्विकारला असुन सदर कार्यक्रमास युवा उद्योजक नितिन एडके व लहानु निवृती सदगीर (अध्यक्ष युवा उद्योग समुह) व विविध क्षेञातील अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी विविध कार्यक्षेञातील अनेक मान्यवरांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तानाजी धरणे हे जरी ग्रामविकास अधिकारी म्हणुन प्रशासकीय सेवेत काम करत असले तरी त्यांचे आजवर "शेताच्या बांधावर, सांजवेळ, स्वप्नचित्र, चांदणं पेरीत जाऊ, होरपळ हे पाच काव्यसंग्रह प्रकाशित असुन त्यांचा सहावा काव्यसंग्रह "नांगरतो तळहाताच्या रेषा" हा ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक यांचेमार्फत लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच त्यांची आगामी 'पायपीट' ही ग्रामिण बाज असलेली नवीन कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांची 22 गीतं विविध यु ट्युब चॅनलवर प्रकाशित झालेली आहेत. 5 मार्च 2023 रोजी त्यांची प्रकाशित झालेली संघर्षमय व हृदयस्पर्शी 'हेलपाटा' ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली असुन या कादंबरीला आत्तापर्यत विविध संस्थांचे उत्कृष्ट कादंबरीचे बारा साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. या कादंबरीची अनेक मान्यवरांकडून पुस्तक परीक्षणे झाली आहेत. लवकरच 'हेलपाटा' कादंबरीची हिंदी व इंग्रजी आवृती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तानाजी धरणे यांची कविता महाराष्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ "बालभारती" किशोर मासिक डिसेंबर 2023 या मासिकात प्रकाशित झालेली आहे. हेलपाटा कादंबरीला वाचकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहुन आपण भाराऊन गेलो असल्याचं मत तानाजी धरणे यांनी व्यक्त केले.
तसेच अल्पावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी पी.एच. डी. संशोधन अभ्यासासाठी ज्या दहा कादंबर्या निवडल्या त्यात "हेलपाटा" कादंबरीचा समावेश झाला ही मला लेखक म्हणुन खुप खुप सुखावणारी व साहित्यिक कार्याला 'बळ' देणारी घटना आहे असे ते म्हणाले.