संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये गुरूपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - गुरूजनांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा होय. ह्या निमित्ताने होली क्रॉस शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमे निमित्त खास कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. गुरूजनांच्यानिरोगी
दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली गेली. त्यानंतर गुलाब पुष्प आणि पावित्र्याचे प्रतीक असणाऱ्या तुळशीचे रोपटे देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गुरुंवरील संस्कृत श्लोक, मराठी - हिंदी कविता, भाषणे तसेच नाटिकेच्या माध्यमातून गुरुंविषयी सद्भावना व्यक्त करण्यात आली. या शुभ प्रसंगी संस्कृत विभागातर्फे शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली. शाळेच्या शिक्षिका सौ मंजिरी देशपांडे ह्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मौलिक विचारांची देणगी दिली. संस्कृत भाषेतून आभार प्रदर्शन, प्रतिज्ञा आणि भारताचे संविधान म्हटले गेले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिंथिया फर्नांडिस, उपमुख्याध्यापिका सिस्टर जिनी, पर्यवेक्षक श्री मोहम्मद हाफिज शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संस्कृत विषयाचे शिक्षक श्री अनिरुद्ध महाजन, श्री गिरीश जोशी तसेच संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.