संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये वृक्षारोपण
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर -
शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सध्या संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जात आहेत; त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपणाचा उपक्रम शहरातील होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूलमध्ये घेण्यात आला.शाळेच्या भारत स्काऊटस् आणि गाईडस् च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेला काही रोपे भेट दिली.शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिंथिया ह्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.शाळेतील सर्व रोपट्याना विद्यार्थ्यांनी पाणी घातले.सर्वांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर जिनी,पर्यवेक्षक मोहम्मद हाफिझ, स्काऊट शिक्षक, गाईड शिक्षिकातसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.