संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित, कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव शाळेतील खेळाडूंनी संस्कृती ग्लोबल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हरसुल सांगवी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादन करून आपले यशाची परंपरा कायम ठेवत कबड्डी स्पर्धेतील आपल्या शाळेचा धबधबा कायम ठेवला.
17 वर्षाखालील मुले : प्रथम
19 वर्षाखालील मुले : प्रथम
क्रमांकाने विजय संपादन करून विभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीरावजी देसाई साहेब, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी गोकुळची तांदळे साहेब,डॉ माणिक राठोड, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रेखा परदेशी मॅडम, लक्ष्मण सपकाळ, माने सर, विठ्ठल शेळके, ज्ञानेश्वर सावंत, करण लघाणे आदी मान्यवर व जिल्ह्यातून आलेल्या तालुका समन्वयक, शाळेंचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रा चंद्रकांतजी गायकवाड साहेब, प्रा ज्ञानदेव मुळे, जिल्हा असोसिएशनचे सचिव डॉक्टर युवराज राठोड, जिल्हा असोसिएशनची उपाध्यक्ष आप्पासाहेब लघाणे, बाळासाहेब सारूक, ज्ञानेश्वर सोनवणे, कैलास वाघमारे, सचिव श्री वाल्मिकरावजी सुरासे साहेब, उपाध्यक्ष विठ्ठलजी पैठणकर साहेब, कोषाध्यक्ष विशाल सुरासे सर,तालुका क्रीडा अधिकारी मुकुंजी वाडकर साहेब, तालुका क्रीडा मार्गदर्शक डॉ सोमनाथ टाक, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री निलेशजी गायकवाड सर क्रीडा शिक्षक बालाजी नलभे स्वप्नील गव्हाणे, सुनील गोरे,सुदाम पवार, कृष्णा पांढरे, सुरज आहेर, केतन गायकवाड, सहशिक्षक नंदकिशोर पातकळ, स्वप्नजा पाटील, विजय सपकाळ, सोन्याबापु पालवे, नारायण औटे, भाऊसाहेब गायकवाड, अमोल गायकवाड, प्रकाश कामडी, आकेश दांडेकर, प्रविण काळे, अनिता गायकवाड, शितल थिटे, अस्मिता भिसे, अक्षय शेळके, ओंकार औटे, निखिल पापुलवार, सतिष पवार, विठ्ठल त्रिभुवन, महेश गायकवाड यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.