संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दखनी स्वराज्य, जालना (वार्ताहर) जिल्हा प्रतिनिधी दि. २६ : भारतीय हौशी महासंघाच्या निर्देशानुसार जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे १८ वर्षाखालील मुले व मुलींसाठी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दिनांक ६ जून ते १० जून २०२५ या कालावधीत पुणे येथे आयोजित केल्या आहेत त्यासाठी जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनचा संघ निवडण्यासाठी रविवार दि २५/०५/२०२५ रोजी पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी कबड्डी निवड स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनच्या अध्यक्ष्या श्रीमती माधवी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणामध्ये माधवीताई काळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी खेळाचे महत्व आणि खेळाडूंची एकजूट तसेच सांघिक कामगिरीला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले कबड्डी या खेळामध्ये मी बेस्ट असून उपयोग नाही तर आम्ही बेस्ट असलो पाहिजे असा मूलमंत्र त्यांनी खेळाडूंना दिला. या स्पर्धेतील एकूण आठ संघांपैकी जिजामाता क्रीडा मंडळ किनगाव या संघाने अजिंक्यपद पटकावले तर उपविजेता संघ काळोखा माता क्रीडा मंडळ डुकरी पिंपरी हा ठरला मुलींच्या संघामध्ये जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी जालना हा एकमेव संघ सहभागी झाल्यामुळे तोच संघ विजयी घोषित करण्यात आला. यावेळी असोसिएशनच्या वतीने खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला खेळाडू विरेंद्र मंडलिक याचा सत्कार करण्यात आला. निवड समिती सदस्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू रवींद्र ढगे, दिनेश वाघ, बाबासाहेब मंडळे, संजय येळवंते, यांनी काम पाहिले तर पंच म्हणून हरी वाडेकर, अजय काळवणे, कृष्णा जाधव, गणेश ढगे, विठ्ठल दिवटे, रोहिणी बिनीवाले यांनी काम पाहिले विजयी संघामध्ये अनिल गायकवाड, ज्ञानेश्वर चव्हाण, राजेंद्र बोंबले, दुर्गेश गायकवाड, हरी ओम गायकवाड, वीरेंद्र मंडलिक, दिनेश शिंदे यांचा समावेश आहे तर संघाचे मार्गदर्शक रोहित बिन्नीवाले व अजय काळवणे हे आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील जायभाये तर प्रमुख पाहुणे प्रा सोपानराव तेलगड हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय येळवंते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डॉ रामदास निहाळ यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सदस्य राहुल वाहुळे, बाबासाहेब मंडळे, रवींद्र ढगे, गणेश ढगे, परमेश्वर जाधव, सुनील रोडे, कृष्णा जाधव, दिनेश वाघ, विठ्ठल दिवटे व सुंदर थोरात यांनी प्रयत्न केले.