Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 03 January 2025 07:53 PM

ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी 


(दैनिक दखनी स्वराज्य, खुलताबाद वार्ताहर):

 तालुक्यातील बाजार सावंगी येथील महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला मुक्ती दिवस व बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु स्नेहल दांडेकर व कु सलमा शेख यांनी सूत्रसंचालन केले तर काही विद्यार्थिनींनी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये १) कल्याणी जाधव-किरण बेदी २) पल्लवी वेताळ -झाशीची राणी ३)शिवानी काळे-जिजामाता ४) वैष्णवी माचवे-ताराराणी ५) ज्ञानेश्वरी चंदिले -सईबाई ६) ऋतुजा कामठे-सिंधुताई सपकाळ ७) कोमल पल्हाळ-अहिल्याबाई होळकर ८) सानिका माळकर - येसूबाई ९) प्रिया काळे - सावित्रीबाई फुले १०) रेश्मा शेख-लता मंगेशकर ११)हिना शेख-मदर तेरेसा १२) हर्षदा चव्हाण - सोयराबाई १३) साक्षी काळे-पुतळाबाई १४) कावेरी धुमाळ - सकवारबाई १५) अंजली धुमाळ - डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी वेशभूषा परिधान करून मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश झिंजुर्के सर हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून बाजार सावंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अशोक महालकर सर उपस्थित होते. महालकर सरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेला जीवन प्रवास करत असताना आलेले कठीण प्रसंग आणि त्यावर सावित्रीबाईंनी कशा पद्धतीने मात केली  त्यांचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितला. तसेच महाविद्यालयाचे शिक्षक मनोज राणे, योगिता पारनेरे, नितीन पवार, राम राठोड, वृषाली कुलकर्णी, कृष्णा चव्हाण, अविनाश गाडेकर, योगेश सुरडकर, सुरेखा जाधव, दिपक पाटील, राहुल गायकवाड, विकास माळी, भूषण जाधव, अविनाश कोलते, अक्षय जाधव, धुमाळ बाबा व वहाटुळे मावशी उपस्थित होते.