Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

ज्ञानेश्वर विद्यालयात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणा अंतर्गत विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन संपन्न

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 30 September 2024 10:43 PM

ज्ञानेश्वर विद्यालयात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणा अंतर्गत  विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन संपन्न



(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - बेगमपुरा येथील मराठा शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर विद्यालयात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणा अंतर्गत  विद्यार्थिनीच्या स्वसंरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण व महिलांसाठी मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य श्रीमती संगीता चव्हाण या उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना स्वतःच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन केले. 

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रतिभा जगताप यांच्या वतीने पाच दिवसीय शिबिर येथील ज्ञानेश्वर विद्यालयात घेण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात तीनशे ते साडेतीनशे मुलींनी सहभाग घेतला. 
स्त्री सुरक्षा आणि स्वसंरक्षण परिस्थितीशी समरस होऊन जास्तीत जास्त चांगले काय शिकता येईल.
 विद्यार्थ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था कशी तत्पर आहे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुड टच अँड बॅट टच या विषयावर प्रतिमा जगताप यांनी मार्गदर्शन केले.
 याप्रसंगी ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मोरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिजन काय आणि कसे साध्य करावे.
 यावर माहिती देऊन आपलं ध्येय कशा पद्धतीने साध्य करता येईल या पद्धतीचा आराखडा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला व व विद्यार्थिनींनी स्वतःच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी सजग राहील पाहिजे. तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर प्रशासनाकडं त्याचे रीतसर तक्रार करावी जेणेकरून त्यावर आम्हाला प्रतिबंध करता येईल. तक्रार पेटी आपण शाळेत लावलेले आहे त्यामध्ये आपल्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रार बॉक्स मध्ये लिहून टाकाव्या त्यावर नक्की विचार करता येईल असं आवाहनही त्यांनी विद्यार्थिनींना केले आहेत.
 विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रत्यक्ष धडे निखिल पुसे आणि शुभांगी आडे यांनी दिले.
 याप्रसंगी आ. प्रदीप जयस्वाल संपर्कप्रमुख प्रतिमा जगताप, युवराज डोंगरे, शाळेचे पर्यवेक्षक 
एस. के. भडके, वैशाली राठोड, लता त्रिवेदी, संगीता सरोदे, सुनंदा जठार, विजय शिंदे, रोहित शिंदे आदी मान्यवरांची यांची उपस्थिती होती .

याप्रसंगी ऍडव्होकेट चव्हाण यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ध्येय कसे गाठता येईल यावर विद्यार्थिनींना भर द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य एडवोकेट संगीता चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.