Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

जेष्ठ लेखक डॉ.श्रीहरी नागरगोजे यांची डॉ.भास्कर बडे यांनी घेतली सदिच्छा भेट

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 17 October 2024 05:20 PM

जेष्ठ लेखक डॉ.श्रीहरी नागरगोजे यांची डॉ.भास्कर बडे यांनी घेतली सदिच्छा भेट


(दखनी स्वराज्य, अंबाजोगाई जि.बीड) 
दि.१७.१०.२४, सकाळी ११ वाजता आंबेजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रीहरी नागरगोजे यांच्या घरी जाऊन डॉ.भास्कर बडे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या आरोग्याची आणि ख्यालीखुशालीची अस्तेवाईकपणे चौकशी केली. ते डॉक्टर असूनही लेखक आणि साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. मध्यंतरी ते आजारी होते. आता ते ठणठणीत आहेत. त्यांच्या नावावर "श्री" नावाचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
बहूधा हे पहिले आत्मकथन असावे. अनेक साहित्य संमेलनातून त्यांनी हजेरी लावली आहे. पंचविस वर्षांपूर्वी आंबेजोगाईतून ते मसाप परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले होते. त्यांची भेट घेतली तेंव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित प्रत डॉ. बडे यांना दाखवली. 
    ते मूळ थेरला तालुका पाटोदा येथील आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते. प्रसिध्द लेखक, कादंबरीकार गो.नी.दांडेकर यांनी डॉ.नागरगोजेंच्या 
वडीलाकडून संस्कृतचे काही धडे गिरवले होते. याचे ग्रंथ-संदर्भ डॉक्टरांकडे आहेत. थेरल्याच्या जंगलात राहून ह.भ.प.गोपाळराव नागरगोजे यांनी वारकरी ग्रंथाचा अभ्यास केला.
           डॉक्टर झाले आणि नौकरीनिमित्ताने महाराष्ट्रभर परिचित झाले. निवृत्तीनंतर ते आंबेजोगाईत स्थायिक झाले आहेत.