Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

जीवनात संघर्ष केल्यास यश निश्चित मिळते : मनोहर मोहरे

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 10 October 2024 07:46 AM

जीवनात संघर्ष केल्यास यश निश्चित मिळते : मनोहर मोहरे


(दखनी स्वराज्य, पुणे) -

         अपयशाने खचून निराश न होता सतत प्रयत्न व संघर्ष केला पाहीजे. त्यामुळे आपल्याला जीवनात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कवी व लेखक मनोहर मोहरे यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी (चिं) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत नवरात्र उत्सवानिमित्त 'मान्यवर आपल्या भेटीला' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोहरे यांनी विद्यार्थ्यांना अनेक संघर्षमय कथा सांगून प्रेरित केले. त्याचप्रमाणे स्वतःचा संघर्षमय प्रवासही उलगडून सांगितला.
                मोहरे यांनी विद्यार्थ्यांना कथा व कविता निर्मितीचे तंत्र याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. कथाबीज, योग्य शीर्षक, भाषाशैली, संवाद, घटनांचा क्रम आशय व समारोप या बाबी प्रामुख्याने कथालेखनासाठी महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे कविता ही अंत :करणातील वेदनेतून खऱ्या अर्थाने फुलते. परंतू विद्यार्थीदशेत यमक जुळवून चारोळी तयार केल्यास भविष्यात कवितानिर्मितीची आवड निर्माण होऊन दर्जेदार कविता निर्माण होतील असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
           यावेळी विद्यार्थी तन्मयतेने ऐकत होत. आम्हीही कथा व कविता निर्मितीचा प्रयत्न करू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी मोहरे यांना दिले. यावेळी मनोहर मोहरे यांनी त्यांची स्वलिखित पुस्तके शाळेला भेट दिली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर पाबळे, शिक्षक राजेश दांगट, सविता कडवे, पूजा निपूंगे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक वैशाली गाढवे यांनी स्वागत केले. मोनिका वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री रोकडे यांनी परिचय तर ठकसेन गवारी यांनी आभार मानले.