संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जयश्री बनसोड-मोहिते यांना पीएच.डी पदवी प्राप्त
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - येथील
जयश्री बनसोड-मोहिते यांनी नुकतीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी
"नव्वदोत्तर मराठी कादंबरीचे स्त्रीवादी आकलन" या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता.
संशोधन मार्गदर्शक म्हणून
प्रतिष्ठान महाविद्यालय,पैठण येथील मराठी विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डाॅ. सुशीला सोलापुरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. विद्यापीठाने नुकतीच त्यांना शिक्षण क्षेत्रातील पीएच.डी.
ही सर्वोच्च पदवी बहाल केली आहे. त्यांच्या या यशासाठी विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.