संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जि.प.आनंदपूर शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध
नरेश सिकची / दखनी स्वराज्य
पैठण - आनंदपुर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ता.पैठण येथे शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी पालक सभेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष म्हणून नामदेव सुधाकर खराद, उपाध्यपदी श्रीमती मंदाताई संतोष खराद, सचिव पदी मुख्याध्यापक अरुण शेषराव गोर्डे तर सदस्यपदी तुकाराम श्रीकिसन तांबे, संतोष सोमनाथ बनकर, अनिस रशीद शेख, सोमनाथ भानुदास पवार, छाया परमेश्वर नरके, यशोदा पांडुरंग लगडे, शितल राजेंद्र राजगुरु तर शिक्षणतज्ञ म्हणून सतिश पंडित तांबे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी निरीक्षक म्हणून आपेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तमराव खरात यांनी काम पाहिले. निवड झालेल्या नुतन कार्यकारिणीचा शाळेतर्फे आपेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तमराव खरात, मुख्याध्यापक अरुण गोर्डे, उदय सुलाखे सुनील जोशी, भागवत पांगरे, भक्तराज फुंदे, शशिकांत ठोंबरे, वर्षा गर्जे, सतिशराव खराद, अनिल कुटे आदींनी सत्कार केला.
निवडप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आनंदपूर गावचे ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी तसेच मुख्याध्यापक अरुण गोर्डे, पदवीधर शिक्षक उदय सुलाखे, सुनील जोशी भागवत पांगरे, भक्तराज फुंदे, शशिकांत ठोंबरे, वर्षा गर्जे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शशिकांत ठोंबरे यांनी तर आभार उदय सुलाखे यांनी मानले.