संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जिल्हाधिकाऱ्यांची गणोरीच्या जि.प.प्रशालेला आकस्मिक भेट
▪️ प्रयोगशाळांची केली पाहणी
दखनी स्वराज्य, फुलंब्री : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा श्री दिलीप स्वामी यांनो जिल्हा परिषदेच्या गणोरी येथील प्रशालेला शुक्रवारी आकस्मिक भेट दिली. या भेटीत फुलंब्री येथील तहसीलदार डॉ. श्री कृष्णा कानगुले, गटविकास अधिकारी श्रीमती मोरे हे अधिकारी त्यांच्या समवेत होते. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री स्वामी यांनी प्रशालेत असलेल्या बोलक्या भिंती आणि विज्ञान प्रयोगशाळांची पाहणी केली.विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशालेत योजले जात असलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. मा जिल्हाधिकारी यांचे ग्रंथ देऊन स्वागत प्रशालाचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी केले.छत्रपती संभाजी नगर येथे येण्यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी राबविलेल्या सर्व उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती शिक्षकांना बैठक घेवून दिली. वाचन सवयी विकासासाठी प्रशालेतील "वाचाल तर वाचाल"ग्रंथालयाचे कामकाज त्यांनी समजून घेतले.स्पर्धा परीक्षांच्या निकालाबाबत शिक्षकांच्या बैठकीत अभिप्राय घेतले. प्रशालेत नव्याने स्थापित करण्यात आलेल्या प्रयोगशाळेतील प्रयोगाची पाहणी करताना त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. प्रयोगशाळेत असलेल्या अंतराळवीराच्या पोशाखात सेल्फी काढून त्यांनी शिक्षकांचा उत्साह वाढवला.या प्रसंगी सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.