संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
(दै.दखनी स्वराज्य/महेंद्र नरके) पैठण पंचायत समितीची ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.प्रकाश लोखंडे यांचा सेवापुर्ती सोहळा पैठण येथे अभिनंदन मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन नंदलाल काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पैठणचे तहसीलदार शारंग चव्हाण हे होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, गट शिक्षण विस्तार अधिकारी श्री पुदाट, भाजपा प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी रेखाताई कुलकर्णी, तैलीक महासभेचे मराठवाड्याचे नेते कल्याण सेठ बरकसे, मराठवाडा साहित्य परिषदचे संचालक प्रा. संतोष पाटील तांबे, माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील गोरडे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, पाचोडचे सरपंच शिवराज पाटील भुमरे यांचे सामोयोचीत भाषणे झाली. मंचावर माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान, डॉ. पंडित किल्लारिकर, ज्योती दीक्षित- जोशी, निलेश गायकवाड, सचिन सेवणकर, सुनीता काळे, डॉ. बाबर, शिक्षक संघटनेचे नेते योगेश शिसोदे, मुश्ताक शेख, राजधर फसले, माजी नगरसेवक श्रीनाथ सेठ पोरवाल, दिलीप मगर, सचिन उंडाळे, सुनील बलदवा, श्रीकृष्ण कुलकर्णी, आर.बी.रामावत, सुभाष नवथर, प्राचार्य संदीप काळे, बालाजी नलभे आदींची उपस्थिती होती.
मनमिळाऊ मैत्रीचे संबंध जोपासणारा अधिकारी सेवानिवृत्त होत आहे, त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुख समृद्धीच्या शुभेच्छा सर्वांच्या वतीने दिल्या गेल्या. प्रकाश लोखंडे यांनी सत्काराला उत्तर देताना माझ्यावर सर्वांनी प्रेम केले. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी ही माझी जबाबदारी पार पाडू शकलो व सर्व प्रशासनाचे मला नोकरी करत असताना उत्तम सहकार्य लाभले व सर्वांचे आभार मानले. प्रास्ताविक प्रा. संतोष गव्हाणे यांनी केले, सूत्रसंचालन किरण गाडेकर यांनी केले तर आभार गणपत मिटकर यांनी मानले.