संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कै. सावित्रीबाई जोशी पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : येथील
जीवन विकास ग्रंथालयाच्यावतीने मराठवाड्यातील नवोदित लेखकांसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत
( कै.) सावित्रीबाई जोशी पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालयाचे कार्यवाह डाॅ. रा. शं. बालेकर यांनी केले आहे.
जीवन विकास ग्रंथालयाच्यावतीने मागील 26 वर्षापासून मराठवाङ्यातील नवोदित लेखकाच्या पहिल्या साहित्याकृतीसाठी (कै.) सावित्रीबाई जोशी पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्काराचे 27 वे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी दिनांक 1 एप्रिल 2023 ते दिनांक 31 मार्च 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पहिल्या छापील प्रकाशित साहित्यकृतीचा विचार करण्यात येईल. यासाठी साहित्य प्रकाराची कोणतीही अट नाही. योग्य माहितीसह भरलेल्या प्रवेश पत्रिकेसह ग्रंथाची एक प्रत दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ग्रंथालयात पाठविण्यात यावी. प्रवेशिकेचा नमूना ग्रंथालयात विनामूल्य उपलब्ध आहे. हा पुरस्कार मराठवाडयातील नवोदित लेखकाच्या पहिल्या साहित्याकृतीसाठी आहे याची नोंद घ्यावी. मराठवाडयातील नवोदित लेखकांनी आपले साहित्य पुरस्कारासाठी पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता- कार्यवाह, जीवन विकास ग्रंथालय, 195, टिळक नगर, छत्रपती संभाजीनगर 440005 ईमेल- ta2201002@gmail.com भ्रमणध्वनी 9422712983, 8788042272