Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

कला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समतेचा संदेश

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

कला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समतेचा संदेश


दखनी स्वराज्य, बीडकीन प्रतिनिधी : एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालय बिडकीन येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अनिल गवळे होते. त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनो महापुरुषांच्या विचारांचे वारसदार व्हा असे प्रतिपादन गवळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन आहेर होते. मराठी विभागाचे प्रा. मिलिंद ठोकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, यावेळी डॉ. मुक्तियार शेख, डॉ. रामकिसन मुंडे, डॉ. मुजीब सय्यद, डॉ. प्रसाद करंदीकर, डॉ.रमेश गायकवाड, डॉ.अंजली काळे, डॉ. वैशाली पेरके, डॉ. मोहसीन शेख, शिक्षकेतर कर्मचारी नरहरी उबाळे, संभाजी आंधळे, अण्णासाहेब थिटे, शेख कयूम, तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्चना काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. युसुफ पठाण यांनी केले.