संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये आर्थिक लाभाच्या योजनेत वाढ करा - बुलंद छावा
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्यावतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मा. भालचंद्र जगदाळे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा निधी माहे जुलै 2024 पासून रु.12/- वरून रु.25/- कपात करण्यात येत आहे. त्यामुळे मंडळामार्फत आर्थिक लाभाच्या योजना जसे सर्वसाधारण शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, एमएससीआयटी, परदेश शिष्यवृत्ती, टंकलेखन, गंभीर आजार योजना, कामगार साहित्य प्रकाशन योजना, शिवण मशीन अनुदान ई. योजनांच्या रक्कमांमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेले 'कामगार साहित्य संमेलन' हे सुरू करण्यात यावे. गंभीर आजार योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त आजारांचा त्यामध्ये समावेश करण्यात येऊन लाभार्थ्यास मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करावी. तसेच इयत्ता 5 वी पासून शिष्यवृत्ती देण्यासाठी
आपण तरतूद करावी,अशा मागण्या करण्यात आल्या असून यावेळी बुलंद छावाचे प्रदेश सचिव तथा गुणवंत कामगार सुरेश वाकडे, प्रदेश कार्याध्यक्ष सतीश वेताळ,
प्रदेश संघटक मनोज गायके, जिल्हाध्यक्ष प्रदिप हारदे, युवा मराठवाडा अध्यक्ष संदीप शेळके, संदीप जाधव, अनिल तुपे, बाबासाहेब चौधरी, योगेश देशमुख, अमोल
मानकापे, शिवाजी भिंगारे आदिंची उपस्थिती होती.