संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कर्हेटाकळी येथे सरपंच सुनीता गटकळ यांच्या हस्ते बंदिस्त ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन
दखनी स्वराज्य, शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव : तालुक्यातील कर्हेटाकळी ग्रामपंचायतच्या वतीने 15 वित्त आयोगातुन, अनुसूचित वस्तीसाठी गावात बंदिस्त ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन सोमवारी 29 जुलै रोजी सरपंच सौ. सुनिता गटकळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच शैला राठोड, ग्रामसेवक मयूर देवडे, मा. सरपंच शफिक सय्यद, ग्रा.प.स. दगडू गटकळ, ग्रा.प.स. मोइन सय्यद, ग्रा.प.स संतोष लेंडाळ, सामाजिक कार्यकर्ते विकास गटकळ, राजेंद्र ससाने, रामनाथ ससाने, ज्ञानेश्वर राठोड, गोरख ससाने, सोहेल सय्यद, नज्जू सय्यद, रामचंद्र ससाने, आसिफ शेख, सोनू शेख, रावण ससाने, भीमा दाभाडे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.