संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कन्नड: महाराष्ट्रातील भोई समाज बांधवाचे आराध्यदैवत असलेले करंजखेडा ता.कन्नड येथील जागृत देवस्थान श्री भोईदेव उर्फ ताऊबा महाराज यांचे समाधीस्थळ मंदिर प्रसिद्ध आहे.
मा. केंद्रीय वित्तराज्यमंत्री खा. भागवत कराड यांच्या कडून या भोई देवाच्या मंदिरासाठी 10 लक्ष रू निधी मंजूर करून बांधकाम ला भूमिपूजन करून सुरुवात झाली.आणि कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग भाऊ राजपूत यांनी सुद्धा भोईदेव मंदिर सभा मंडपासाठी 10 लक्ष निधी दिला. या निमित्ताने भोई देवस्थान येथे भूमी पूजन सोहळा पार पाडला या सोहळ्याला कन्नड तालुक्याचे समाजसेवक मनोज भाऊ पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन भोई समाजाच्या वतीने सत्कार केला व त्यांनी सुद्धा या सभामंडपाची शोभा वाढावी म्हणून 2.5 लक्ष रुपये रोख देणगी च्या स्वरूपात दिले. यावेळी निधी उपलब्ध करून आणल्या बद्दल अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था चे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे यांचे उपस्थित समाज बांधवांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या भूमी पूजन सोहळ्याला विलास महाराज भगत, ॲड. दादाराव आळणे (भाजपा ओबीसी प्रदेश सचिव), ॲड.शंकर वानखेडे (विधी विभाग उपाध्यक्ष,भाजपा), अवचित नाना वळवळे (शिवसेना उप जिल्हा प्रमुख), पत्रकार दत्तू आबा पवार, ज्ञानेश्वर वानखेडे, येशिनाथ वानखेडे, भगवान वानखेडे, पंडित बनसोडे, अतुल पवार, भाऊसाहेब पवार, विनायक पाटील, नवनाथ ढोले, शिवाजी मोरे, अशोक वायडे (तालुका अध्यक्ष - अ.भा.भो.स.से.सं), किशोर बनसोडे (शहर अध्यक्ष - अ.भा.भो.स.से.सं), पंकज बावणे (तालुका उपअध्यक्ष - अ.भा.भो.स.से.सं), विजय वानखेडे, चंद्रकला वानखेडे, तानाबाई आळणे, एकनाथ वानखेडे, चंदू लाडे, नंदू वाघ, अशोक श्रीनाथ, कैलास बनसोडे, राजू वानखेडे, राम बाबा वानखेडे, बाबासाहेब ढोले, मधू ढोले, प्रदीप भागाजी वानखेडे, प्रदीप नारायण वानखेडे, आकाश वानखेडे, सचिन वानखेडे, गणेश वानखेडे, संदिप वानखेडे, राजू वानखेडे, नागेश बनसोडे, अंकुश गवळी, चेतन वाल्डे, तातेराव भुजंग, शुभम ढोले, आनंदा बनसोडे, कारभारी वानखेडे, संतोष वानखेडे, संजू वानखेडे, सुभाष पवार व मंदिरा च्या आजू बाजूला सहकार्य करणारे शेतकरी बांधव व जिल्ह्यातील समस्त भोई समाज बांधव उपस्थित होते.