Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

खाजगी कोचिंग क्लासेसच्या असुविधांची चौकशी करून कारवाई न केल्याने छावाचा 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

खाजगी कोचिंग क्लासेसच्या असुविधांची चौकशी करून कारवाई न केल्याने छावाचा 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा


दखनी स्वराज्य, पैठण : खाजगी कोचिंग क्लासेसच्या जागेची व्यावसायिकता तपासा या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले यांनी दिला.


वेळोवेळी पैठण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने 31 जुलै रोजी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. यात म्हटले आहे की खाजगी कोंचिग क्लासेसच्या जागा अथवा बिल्डींग ज्या घर मालकाने भाडे तत्वावर दिली आहे त्या ईमारती व्यावसायिक आहेत का? सदर इमारतीत स्वातंत्र पार्कीग व्यवस्था, मुला मुलींना स्वतंत्र स्वच्छता गृहे आहेत की नाही, अग्निशामक दलाचे फायर ऑडीट वेळो वेळी होते का? ईमारत परिपूर्ती प्रमाणपत्र आहे का हे तपासले जावे. जेने करून भविष्यात दिल्ली व कोटा (राजस्थान) सारख्या घटना दुर्दैवाने घडणार नाही. सदरील मागण्यांची चौकशी करण्यात यावी. विशेष म्हणजे अत्यंत लहान आणि अपुऱ्या जागेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे व्यवसाय केला जातो आहे. परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होत असून नगरपरिषद काहीच कारवाई करत नसल्याने 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले, तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते, अडसूळ, अर्जुन खराद, जिजा कर्डिले, चिराग फारोखी यांनी दिला आहे.