संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कोलकात्याच्या मेडिकल कॉलेज घटनेचा क्रांतीचौक निषेध
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर -
रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर.जी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरातील महिलांच्या वतीने क्रांती चौक येथे काळ्याफिती बांधून या प्रशासनाचा निषेध केला. तसेच पीडिता डॉक्टरला मेणबत्ती पेटून श्रद्धांजली वाहिली. या
प्रशासनाचा निषेध करत नराधमांना तात्काळ फाशी देऊन पिडीतेला त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा ही मागणी उपस्थित सर्व समाजातील महिलानी केली. यावेळी अंकिता विधाते, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, तनश्री चव्हाण, अंजली वडजे, दिव्या पाटील, शिल्पा भोसले, शिल्पा शहा, कविता शिंदे, संगीता जाधव, विद्याराणी वाडकर, प्रियंका मंदारे, संगीता लोहाडे, साळुंखे माधुरी, सीनियर इनरवेल क्लब ऑफ औरंगाबाद लोटस व सेंट्रल ह्या एनजीओच्या महिला देखील उपस्थित होत्या. लता काळे, सुनिता बागडे, अर्चना बच्छाव, वैशाली सद्गुळे, मनीषा चिपळूणकर, भावना मुळे, प्राची रत्नपारखी, शुभांगी कुलकर्णी व इतरही महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.