संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कृषी दुतांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : येथील नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय येथील अंतिम वर्षाच्या ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभवच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले.
हे प्रात्यक्षिक करत असताना पांढरी(पिं.) गावातील दहा ते बारा शेतकरी उपस्थित होते. कृषी दुतांनी शेतकऱ्यांना रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करून दाखवली. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळेस दिसून आला; त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रात्यक्षिक बघितले. शेतकऱ्यांना आलेल्या विविध प्रश्नांचे कृषी दुतांकडून निराकरण करण्यात आले.
हा प्रयोग करताना एम.जी.एम ना.क.कृ. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एम.मस्के, ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव समन्वयक डॉ.जी.आर.गोपाल, कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.ए.शेळके, वनस्पतीशास्त्र तज्ञ डॉ.ए.वी.शिंदे, डॉ.बी.एन.थोरात, डॉ. वी.एस.कोहळे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.