Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

"लीड"च्या सर्वेक्षण स्पर्धेत आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल, पैठण ठरली देशात नंबर वन!

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 21 March 2025 10:11 PM

"लीड"च्या सर्वेक्षण स्पर्धेत आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल, पैठण ठरली देशात नंबर वन!


दखनी स्वराज्य वृत्तसेवा


छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील पैठण येथील आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल ही शाळा लीड या अभ्यासक्रमांतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षण स्पर्धेत राज्यात, झोनल आणि देश अशा तिन्ही स्तरावर नंबर वन म्हणून निवडली गेली आहे. 
'लीड' या अभ्यासक्रमांतर्गत देशात एकूण नऊ हजार शाळांचा समावेश आहे. यामधे २०० विद्यार्थी संख्येच्या गटात तब्बल एक हजार शाळांना मागे टाकत पैठण येथील आयकॉन पॅराडाईज प्रायमरी इंग्लिश स्कूलने देशात एक नंबर पटकावला आहे.  

अशी होती निवड पद्धत!

"लीड" ने आपली एक वेगळी निवड पद्धत विकसित केलेली आहे. यांमध्ये शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम नेमून दिलेल्या वेळेत किती टक्के पूर्ण केला हे तपासले गेले. झालेल्या अभ्यासक्रमावर किती चाचणी घेतल्या ते तपासले.
या चाचण्यात विद्यार्थ्यांना किती गुण आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांची सरासरी गुणवत्ता तपासली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गृहपाठ आणि परीक्षांचे नियोजन किती टक्के केले यालाही गुणांकन दिले गेले. यामुळे शिक्षक, शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागातून शाळांची गुणवत्ता तपासली गेली. या चारही स्तरात आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल देशात नंबर एक राहिली हे विशेष! प्रत्येक आठवड्याला ही गुणांकन तपासले गेले. ३० आठवड्याच्या या दीर्घ कालावधीत सातत्य राखण्यासाठी झालेले प्रयत्न बहुमूल्य आहेत, असे लिडचे कोर्डिनेटर शूम बॅनर्जी सर, फदीम खान, धीरज गादीया यांनी निकाल देताना म्हटले आहे.


सर्व स्तरातून अभिनंदन 

विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल, पैठण ही देशात अव्वल आल्याने संस्था कोषाध्यक्ष सौ.शीला तांबे आणि प्राचार्य आर.बी. रामावत यांनी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल कोळगे यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका श्रीमती मंगल कोळगे मॅडम यांच्या मार्गदर्शनात सौ.लता पवार, सौ.सोनाली गोरे, सौ.कविता दसपुते, श्रीमान अशोक चव्हाण, श्री एम.एस.नरके, सौ. शीतल मुंडे, सौ. रुचिका कुलकर्णी, श्रीमती हर्षदा मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सामूहिक यशाबद्दल संस्था अध्यक्ष संतोष तांबे, सचिव मानसी नवथर, उपाध्यक्ष विशाल तांबे, सहसचिव सौ.अंजली पवार, संचालिका डॉ.अनुराधा गायकवाड, संचालक कैलास मुके पाटील, संचालिका इंजि. ज्ञानेश्वरी ससाने, संचालिका प्रा. प्रतिक्षा गोरडे, संचालिका सौ. रंजना कासोळे, सदस्य सौ.हुमेरा शेख, सौ.हिरा नवथर, सौ.नीता तांगडे यांनी अभिनंदन केले आहे.