Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

मेहेगावच्या भगवान गडावरील तिफण कविता महोत्सवात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 10 December 2024 10:30 PM

मेहेगावच्या भगवान गडावरील तिफण कविता महोत्सवात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन


दैनिक दखनी स्वराज्य, कन्नड  :

त्रैमासिक तिफण, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नडच्या वतीने मेहेगाव भगवानगड  ता. कन्नड येथे दि. ५  जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या तिफण कविता महोत्सवात सहभागी साहित्यिक, रसिक, शिक्षक, विद्यार्थी यांना पुस्तक खरेदी करता यावे. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ग्रामीण भागात लेखक व वाचक यांच्यात संवाद घडावा या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कविता महोत्सवात विद्यार्थी, युवक, शिक्षक, कवी , कवयित्री आणि राज्यभरातील कवितेचे अभ्यासक रसिक सहभागी होत असतात. दिवसभर चालणा-या या कविता महोत्सवात लेखक - वाचकांना पुस्तक खरेदीचा आनंदही घेता येणार आहे. औरंगाबाद येथील मान्यवर प्रकाशन संस्थांचे स्टॉल या ग्रंथ प्रदर्शनात सहभागी होणार असल्याची माहिती कविता महोत्सव संयोजन समिती तर्फे देण्यात आली आहे.