संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथे दससूत्री कार्यक्रमा अंतर्गत प्रशालेचे माजी विदयार्थी यांच्या वतीने प्रशालेतील 372 बालक व पालकांची बी पी,शुगर,ई सी जी, रक्त,एच आय व्ही,इत्यादीची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शालेय प्रागणात वृंक्षारोपन करण्यात आले.
यावेळी पालक,विद्यार्थी,शिक्षक, व माजी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतांना डॉ.रत्नपारखे यांनी सांगितले की पालकांनी आपल्या मुलांकडे जास्तीचे लक्ष केंद्रीत करावे,त्याना खेळण्यासाठी मोबाईल देऊ नये तर तो मोबाईल वर काय करतो याकडे लक्ष दयावे.त्याला बाहेरील जंक फूड न देता घरात बनविलेल्या वस्तू खायला दयाव्यात तरच तो निरोगी राहील,तसेच समाजाने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून समाजकार्य करावे.देशाचा नागरिक सुजाण बनावा ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी कार्य करत रहावे. प्रत्येकाने समाजासाठी मित्रा साठी वेळ दिला पाहिजे मित्रता जपली पाहिजे,तर शिक्षकांनी आपल्या विदयार्थ्यांसाठी इमानदारीने स्तकार्य करावे म्हणेजे चांगले विद्यार्थी घडतील आपला देश मजबूत बनेल असे सांगितले.या वेळी कार्यक्रमाचे उदघाट्क-डॉ.विकास रत्नपारखे (एम.डी.मेडिसिन)छत्रपती संभाजीनगर.हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष-डॉ.पंडित किल्लारीकर(एम.एस.सर्जन) घाटी रुग्णालय पैठण हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून-डॉ.रमेश खोबरे(एम.डी अनेस्थेशिया)छ. संभाजीनगर,डॉ.नितीन पवार, डॉ,सुरेश खंदारे,डॉ.शशिकांत घेर,हे होते.
सदरील डॉक्टरांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी केली.या तपासणीत 42 पालकांना बी पी,व शुगर,असल्याचे सिद्ध झाले.त्या आजारी पालकांना प्रशालेचे माजी विदयार्थी मोफत औषध व गोळया उपलब्ध करून देणार असल्याचे राजकुमार रोहरा यांनी सांगितले.
या वेळी माजी विद्यार्थी-प्रशिद्ध व्यापारी-राजकुमार रोहरा,संजय वाघचौरे,माजी मुख्याध्यापक- धनराज जाजे,विस्तार अधिकारी- अनिल पुदाट,मुस्ताक शेख,केंद्र प्रमुख-उत्तम खरात,ज्ञानेश्वर वाडेकर,पालक व विद्यार्थी मोठया संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-समशेर पठाण,यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक- अंकुश गाढे,यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी- फैय्याज शेख,ताराचंद हिवराळे, दिलीप तांगडे,उस्मान बागवान, राजेश पाखरे,थोटे,बारगजे, वैशाली कुटे,यास्मिन शेख,नेहा सय्यद,ज्योती बलखंडे,चाँद शेख,फुरकान शेख यांनी परिश्रम घेतले.