Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

मीना म्हसे यांच्या सूत्रसंचालनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 02 May 2025 12:50 PM

मीना म्हसे यांच्या सूत्रसंचालनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

दखनी स्वराज्य, ता. 01 पुणे प्रतिनिधी :


       जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना म्हसे यांनी नुकत्याच एका सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन केले होते. याप्रसंगी ओघवत्या शैलीत केलेले निवेदन व प्रसंगांना अनुरूप वापरलेल्या चारोळ्या यामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. त्याला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांची दाद देत उस्फूर्त प्रतिसाद दिला.
           नाव्ही सांडस केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन महादेव भालचिम साहेब यांचा सेवापूर्ती कार्यगौरव समारंभ नुकताच तुकाई कॅम्पिंग नाव्ही सांडस फाटा  येथे पार पाडला. अविरत सेवेची 38 वर्ष पूर्ण झालेल्या भालचिम साहेबांच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाला हवेली तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. यात राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राजेश काळभोर, विस्तार अधिकारी भरत इंदलकर, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र जगताप, विस्तार अधिकारी शंकर मुंडे, हवेली तालुक्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेशदादा कुंजीर, विस्तार अधिकारी राधा पाचपुते, हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयवंत मोहिते, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष सागर शिंदे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल लाड, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका मीना म्हसे यांना देण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलेल्या निवेदनाने सर्वांचीच मने जिंकून घेतली. वेळप्रसंगी वापरलेल्या चारोळ्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी टाळ्यांची दात देत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अगदी पहिल्याच प्रयत्नात अतिशय सराईतपणे केलेल्या निवेदनाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमानंतर त्यांनी आवर्जून भेट घेत त्यासंबंधी अभिप्राय देत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.



आजीवनात सकारात्मक विचार ठेवा 

आयुष्यात कोणतेही काम स्वतःपेक्षा मोठे समजू नये. प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने काम केले तर यश निश्चित मिळते. त्यासाठी गरज असते कठोर परिश्रमांची. जीवनात सकारात्मक विचार ठेवला तर कोणतेही काम अशक्य नाही. 
- मीना म्हसे 
उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी.