संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
रसिक मंडळाने माजलगावचा सांगितिक माहोल जपला आहे. दोन दशकांपासून ही स्पर्धा मी ऐकतोय. संगीत मानवी जीवनातून वजा होवू शकत नाही. सकारात्मक उर्जा गाण्यातून मिळते, असे विचार रविंद्र कानडे यांनी पारितोषिक वितरणाचे अध्यक्षपद भुषविताना व्यक्त केले.
व्यासपिठावर प्रमुख पाहुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, परिक्षक अंबाजोगाई येथील राणी वडगावकर, डॅा. प्रमोद देशपांडे नांदेड, प्रा. अनुजा पाठक संभाजीनगर, संमोहन जोशी, ॲड भिलेगावकर यांची उपस्थिती होती.
प्रतिमा पूजनानंतर स्वागत सोहळा संपन्न झाला. प्रास्ताविक प्रा. स्नेहल पाठक यांनी केले. लिमगावकर प्रायोजित तबला नवाज स्व. शंकरराव पांडे पुरस्कार रू. 5001/- सन्मानचिन्ह, सुरेश भानप लिखीत मानपत्र देवून संमिहन यांना प्रदान करण्यात आला. कुमार कलावंत संमिहन जोशीच्या सोलो वादनाने सभाग्रह मोहरून गेले.
29.9 ला सकाळी पहिले सत्र परळीच्या भागवत पाठक यांच्या बासरी वादनाने सुरू झाले. उद्याेजक भगवान बप्पा देशमुख यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
बालकुमार व मोठा अशी दोन गटात झालेल्या स्पर्धेने दिवसभर अनंत भालेराव सभागृह गुंजत राहिले.
परिक्षकाच्या वतीने अनुजा पाठक यांनी लक्षवेधी मनोगत मांडून संगीत साधकांना अंतर्मुख केले.
दिवसभरात विविध सत्राचे संचलन डॉ. श्री नरेंद्र निळेकर, मिनाक्षी निळेकर, सखाराम जोशी, स्नेहल पाठक यांनी केले.
विष्णु कुलकर्णी, एल. ए. रत्नपारखी, मधुकर वैद्य, महेश वाघमारे, ॲड, सतिश नरवाडकर, संजय कुलकर्णी, पांडुरंग देशपांडे, ॲड. शर्मा, सुलभाताई देशमुख, दाशरथे, र.ब.देशमुख, जळगांवकर, धनंजय जाडे, शशी गडम, लक्ष्मीनारायण मुंदडा, गौरी सुहास देशमुख, रंगनाथ सावंत, संतोष मुळी, स्वानंद कुलकर्णीं, अर्चना भाले, केदार देशमुख यांच्यासह रसिकांची गर्दी लक्षनिय होती.
*चौकट*
सर्व उपस्थितांना
तुषार हरिहर देशमुख प्रायोजित केलेले चहा नास्ता भोजन हे या समारोहाचे वैशिष्ट्य ठरले.
——
सुरेश देशपांडे यांनी काढलेली रांगोळी लक्षवेधुन घेत होती.
———————
रसिक मंडळ कार्यवाह प्रभाकर साळेगावकर यांनी विजेत्यांची उद्घोषणा केली सुरेश भानप व दिगंबर महाजन यांच्या पुढाकाराने वितरण संपन्न झाले.
आभार प्रदर्शन दिन प्रमुख रत्नाकरराव चौकिदार यांनी केले.
—————
स्पर्धेतील विजेते
*लहान गट*
प्रथम आराध्या कदम, द्वितीय विघ्नेश जोशी, तिसरा स्वरानंद परांडे, उत्तेजनार्थ कादंबरी कासलवादे
——————-
*मोठा गट*
प्रथम वेद मुळे, दुसरा अविनाश घुगे, तिसरी शर्वरी डोंगरे, उत्तेजनार्थ आरोही मंडलिक.