संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
मांडवगण फराटात रंगला गुरुपौर्णिमेनिमित्त जीवनानुभव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
दखनी स्वराज्य, शिरूर :
जीवनामध्ये वेळेचं आणि गुरुचे महत्व खूप आहे. गुरुचे जीवनात स्थान खूप महत्त्वाची भूमिका घेत असते. तसेच आयुष्यात पुस्तके देखील वाटाड्या प्रमाणे वाट दाखवत असतात. असे वक्तव्य जीवना अनुभव या पुस्तकाचे लेखक कवी राहुल दादा शिंदे यांच्या मनोगत बोलत होते.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावांमध्ये पुण्याई गार्डन कार्यालय इथे रोहिणी पब्लिकेशन मुंबई प्रकाशित व कवी लेखक राहुल दादा शिंदे लिखित जीवनानुभव या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन व वितरण सोहळा दिनांक 21 जुलै 2024 रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक समिक्षा अक्षय फराटे सरपंच मांडवगण फराटा यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुनील माने सर, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूरचे अध्यक्ष श्री मनोहर परदेशी सर, रोहिणी पब्लिकेशन मुंबईच्या फाउंडर रोहिणी वाघमारे मॅडम, मेरी मेमोरियल हायस्कूल काष्टी या शाळेच्या मुख्याध्यापिका शितल जगले त्याचबरोबर लेखक शेखर फराटे , डॉक्टर पूजा शितोळे,मदन दादा फराटे, नवनाथ दादा शितोळे, मांडवगणच्या माजी सरपंच सीमाताई फराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली, तन्मय फराटे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत नंतर पुस्तक प्रकाशन झाले. लेखकांनी आपल्या मनोगत्वातून वाचकांची मनी जिंकून घेतली. तब्बल 25 मिनिटं लेखक श्रोत्यांची संवाद साधत होते. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून लेखकांची स्तुती व कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वतः लेखक यांनी मानले. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन तनवी कोकाटे हिने केले. तसेच सूत्रसंचालनासाठी सहकार्य संतोष परदेशी सर यांनी केले. प्रथमेश कुंभार, आकाश कापुरे, तन्मय फराटे, ओंकार फराटे, शेखर जगदाळे, तन्वी कोकाटे, प्रिया राऊत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य दर्शविले.