संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
(दखनी स्वराज्य, पैठण) -
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्या पैठण बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पैठण व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले आणि शहर अध्यक्ष पवन लोहिया यांच्याकडून बंदला प्रतिसाद देण्याचे आश्वासन सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहे. पैठण येथे सकाळी दहा वाजता ही बैठक संपन्न झाली. बैठकीला तालुक्यातील आणि शहरातील विविध भागातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सोमवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून रॅलीने पाचोड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल. बैठकीनंतर सर्व समाज बांधवांनी पैठण पोलीस स्टेशन येथे जावून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
*खटकेवर गुन्हा दाखल*
मराठा सेवकाला रस्त्यात अडवून त्यास मारहाण करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ध्वजास फाडून महापुरुषांच्या अपमान हेतूने गैर कृत्य करणे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेल्या वडीगोद्री येथील बळीराम खटके या समाज कंटकावर पैठण पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.