संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल, छावणी येथे
मराठीभाषा गौरवदिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या लेझिम पथकाच्या संचलनाने झाली.यावेळी विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडी द्वारे विद्यार्थ्यांनी मराठी ग्रंथांना वंदन केले. कवी कुसुमाग्रज ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, एकांकिका, गीते, भाषणे, सुविचार, नृत्य, लेखक व कवींची माहिती देऊन मराठी भाषेचा गौरव केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिंथिया फर्नांडिस, उपमुख्याध्यापिका सिस्टर जिनी वर्गिसे,पर्यवेक्षक मोहम्मद हाफिझ ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील मराठी विषय शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.