संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
मराठा क्रांती मोर्चा तर्फे पैठण तहसिलदार यांना कुणबी नोंद पुन्हा शोधण्यासाठी व रखडलेले प्रमाणपत्र तत्काळ वितरणासाठी निवेदन
(दखनी स्वराज्य, पैठण) - पैठणचे तहसीलदार श्री सारंग चव्हाण साहेब यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामधे कुणबी नोंदी सापडत नाही आणि ज्या सापडल्या आहेत त्या अल्पप्रमाणात व ठराविक गावात (वाई-देसी) सापडल्या आहेत. तरी पुन्हा तहसिल, रजिस्ट्री ऑफिस, भूमिअभिलेख, पोलिस स्टेशन, पोलीस पाटील, तलाठी सजा व जिथे जिथे नोंदी सापडण्याची शक्यता आहे तिथे पुन्हा एकदा रेकॉर्ड तपासायला हवे व यातुन ज्यांच्या नोंदी आहे ते ओबीसी प्रमाणपत्रापासुन वंचित राहु नये व ज्यांच्या नोंदी सापडल्या आहे किंवा सापडतील त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वितरीत करावे ही प्रमुख मागणी या निवेदनात केली आहे. तसेच पैठण तालुक्यातील सर्व जातींच्या विद्यार्थ्यांचे हजारो विविध प्रमाणपत्र पेंडिंग आहेत, ते तातडीने दिली गेली पाहिजेत. यामधे शैक्षणिक प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात अडकून पडलेले असून विद्यार्थी आणि पालक हवालदिल झालेले आहेत. या मधे उत्पन्न, रहिवासी, डोमोसाईल,EWS आदी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या साठी निवेदन दिले. विशेष म्हणजे सेतू सुविधा केंद्रात सादर केलेले कागदपत्रे दहा ते पंधरा दिवस अपलोड केले जात नाहीत. त्यांना समज देवून तत्काळ काम करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती तहसीलदार साहेबांना करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर नंतर सर्व कार्यालयात व्यापक मोहीम हाती घेऊन नोंदी आढळून येतात का हे तपासल्या जाईल असे सांगितले श्री चव्हाण यांनी निवेदन कर्त्याना अश्वस्थ केले.
या वेळी साईनाथ पा.कर्डिले, अनिल राऊत, पवन शिसोदे, राजेंद्र पन्हाळकर, अशोक बर्डे यांच्या सह असंख्य मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व बहुजन समाज कार्यकर्ते उपस्थित होते.