संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
मराठा समाजातील मुलांसाठी मोफत शिक्षण
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
मराठा समाजातील बहुतांश मुले स्पर्धेमध्ये मागे पडताना दिसत आहेत. उच्च शिक्षणामध्ये तुलनेत मराठा समाजाची संख्या कमी दिसून येत आहे. आरक्षण नाही म्हणून नोकरी मिळत नाही. शेती व्यवसाय धोक्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत भविष्यामध्ये घर चालविणे अवघड झाले आहे. आरक्षण, नोकऱ्यांची उपलब्धता आपल्या हातात नाही, मग आहे त्या परिस्थितीमध्ये स्पर्धेत टिकायचे असेल तर आपली क्षमता वाढवल्याशिवाय पर्याय नाही. खेड्यामध्ये देखील उच्च बुद्धिमत्ता असणारी मुले आहेत, परंतु योग्य मार्गदर्शना अभावी उच्च शिक्षण, उद्योगधंद्यामध्ये प्रमाण कमी आहे. म्हणून या मुलांना चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण छत्रपती संभाजीनगर शहरामधे उपलब्ध करून देण्यासाठी, श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेने मराठा समाजातील गरीब होतकरू मुलांना दत्तक घेऊन, त्यांना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण देऊन, सक्षम बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
संस्थेचे सामाजिक कार्य गेल्या पंधरा वर्षापासून चालू असून, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न चालू असून, शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 500 पेक्षा जास्त मुला-मुलींना मोफत शिक्षणाची सोय करून, त्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याचे काम संस्थेने केलेले आहे. संस्थेचे छत्रपती संभाजीनगर येथे शाळा व वसतिग्रह असून, दहावी नंतर मुलांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश देऊन, त्यांचा सर्व खर्च संस्थेकडून केला जातो.
मुलांची निवड करण्यासाठी संस्थेशी समाजातील होतकरू पहिली ते दहावीच्या मुलांच्या पालकांनी संपर्क करण्याचे अवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री श्यामसुंदर कणके यांनी केले आहे.
संपर्कासाठी पत्ता : श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्था सम्राट नगर प्लॉट. नं-46, बेंबडे हॉस्पिटलच्या पाठीमागे, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर. शामसुंदर कनके. मो.नं. 9423392565