संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पोलिस कॉन्स्टेबल कल्याण ढाकणे यांच्या आवाजातील " अब के बरस तुझे धरती की राणी", वनिता सोनवणे यांच्या गोड आवाजातील " तेरी मिट्टी मे मिल जावा", डॉ. डॅनिएल इंगळे यांचे " कर चले हम फिदा", व्हाइस ऑफ मुकेश नरेश सिकची यांचे, "हम उस देश के वासी है", रुपेश चौहान यांचे "ये देश है वीर जवनोंका", तर अयोध्या पाटील यांच्या आवाजातील अजरामर गीत "ए मेरे वतन के लोगो", सोबत विजय सुते यांचे शानदार सूत्रसंचलन व राजू जगधने यांच्या संगीताची साथ या मुळे पैठणकरांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्ती पर गीतांचा मनसोक्त आनंद लुटला.
२५ जानेवारी रोजी सायंकाळी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांचे मार्गदर्शनाखाली व पैठणचे पो. नि. संजय देशमुख यांचे विशेष सहकार्याने आयोजित "हिंदुस्तान की आझादी की कहानी" या संगीतमय सफर साठी दखनी स्वराज्य चे संपादक संतोष तांबे, शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, किशोर तावरे, नगरसेवक तुषार पाटील, स्वीय सहाय्यक नामदेव खराद आदींसह मोठ्या संख्येने देशभक्त पैठणकर उपस्थित होते.
निवेदक विजय सुते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात त्यांनी आपल्या उत्कृष्ट सूत्रसंचलन द्वारे जणू काही जणू काही भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास प्रेक्षकांसमोर उभा केला. त्यास संभाजीनगर येथील सुप्रसिध्द संगीतकार राजू जगधने, सॅम्युअल, निखिल प्रधान यांच्या सुमधुर संगीताच्या साथीने पैठांकरांनी एक अविस्मरणीय कार्यक्रम अनुभवला.
देशभक्तीमय वातावरणात ओत प्रोत रंगलेल्या "जरा याद करो कुर्बानी - हिंदुस्थान की आझादी की कहानी" या संगीतमय सफर मध्ये पैठण येथील डॉ. डॅनिएल इंगळे, पोलिस कल्याण ढाकणे, व्हाइस ऑफ लता वनिता सोनवणे, शालिवाहन पतसंस्थेचे जनसंपर्क अधिकारी नरेश सिकची, रुपेश चौहान, अयोध्या पाटील, सुहास कुलकर्णी, सुभान पठाण यांच्या सुमधुर गायनाचा पैठणकरांनी मनमुराद आनंद लुटला. अजय गारदे यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले.