संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार
- शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा संपन्न
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी) -
जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका, औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका व शिष्यवृत्ती तज्ञ मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक पुरस्कार कवी हनुमंत चांदगुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार व कवी हनुमंत चांदगुडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव भोंडवे, गुलाबराव गवळे, तुकाराम बेनके, मारुती कदम, मयूर करंजे, जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, अनिल पलांडे, संजय धुमाळ, हे उपस्थित होते.
यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत मसापचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले. व आभार प्रा. गुरुनाथ पाटील यांनी मानले.