संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
मुलानी वाडगाव येथे आरोग्य शिबिर व योगा शिबिर संपन्न
दै दखनी स्वराज्य / गणेश उघडे
डॉ शिंदे यांचा उपक्रम
पैठण तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मुलानी वाडगाव येथे दि.20/07/024 शनिवार रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर, डॉ लांजेवार,डॉ विशाल बेंद्रे,पैठण तालुका आरोग्य अधिकारी डॉ अझहर सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली
गावकरी वयोवृध्द महिला व पुरुष यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच योगा शिबिर आज यशस्वी रित्या संपन्न झाले.
या प्रसंगी सरपंच सौ.वंदना लांडगे, उपसरपंच सतिश शेळके,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ गणेश पा शिंदे, धनंजय मिसाळ, विठ्ठल वायकर, ज्ञानेश्वर उघडे, गणेश उघडे,शिवाजी थोटे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक अशोक हिवाळे, अरुण कसबे, चंदा सोनटक्के व श्रीमती पार्वती रावळे , गट प्रवर्तक समिना शेख व ज्योती लिपाने,आशा कार्यकर्ती वर्षा शेळके,जया जगताप,नंदा थोटे, अल्का घटे, आदींनी परिश्रम घेऊन शिबिर संपन्न केले.
या शिबिरामध्ये महिलांची उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, संशयात क्षयरोग रुग्णाची तपासणी, गरोदर माता, बालक,व पुरुष यांची सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली.