संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत व शिवसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने व जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्लासर यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन येथे युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद व स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समर्थ कोचिंग क्लासेस येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून गणेश खराडकर सर यांची उपस्थिती होती. खराडकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वामी विवेकानंद, ज्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते, ते मानवतेची सेवा हाच आपला परम धर्म मानणारे विद्वान म्हणून इतिहासात नोंदवले जातात. १२ जानेवारी १८८३ रोजी बंगालमध्ये जन्मलेल्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो येथील धार्मिक मेळाव्यात आपल्या अस्खलित भाषणातून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली.
स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आदर्श तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी भारत सरकारने १९८४ मध्ये १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये तरुणांचा समावेश होतो. तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि देशसेवेची भावना जागृत करणे हा या कार्यक्रमांचा उद्देश आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय युवा दिनाची मुख्य थीम “राष्ट्र उभारणीसाठी युवा सक्षमीकरण” आहे. ही थीम तरुणांना देशाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करते.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होत असलेला राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ चा उद्घाटन सोहळा हा सर्व मुलांना लाईव्ह दाखवण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी नेहरू युवा केंद्र कार्यक्रम समन्वयक पंकज धुळे, महेश खराडकर सर, संकेत मोरे, आष्टांग पंडित, राहुल धुळे, वैभव जाधव यांनी परिश्रम घेतले.