संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण: नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी उत्तर येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. श्री ईश्वर जगदाळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संदीप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनंतर मागील वर्षी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चेतन गर्जे यांनी केले. त्याप्रसंगी स.पो.नि. जगदाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी कशी तयारी करावी व स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रम निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माजी केंद्र प्रमुख श्री सुभाष शिंदे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून यश म्हणजे अपार मेहनत करणे होय असे सांगितले. पैठण पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्य तुमच्या हातात आहे ते उज्ज्वल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे तरच देशाला खरे स्वातंत्र्य मिळेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संदीप काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले की आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळवण्याची गरज नाही परंतु ज्यांच्यामुळे आज हे स्वातंत्र्य मिळाले त्यांचे विचार आणि आदर्श तुमच्या पुढे आला पाहिजे. तरच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवले जाईल. सदर कार्यक्रमास परिसरातील प्रतिष्ठित व्यावसायिक श्री नुरभाऊ शेख, श्री पांडू गाढे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अशोक गायकवाड, प्रा. उद्धव ताठे, प्रा. स्वाती धुमाळ, प्रा. मनीषा पाचरणे कार्यालयीन कर्मचारी श्री उमेश जाधव, श्री अजय सातपुते, श्री अवधूत काटकर तसेच गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक, पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी कु. आयशा शेख हिने केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. साईनाथ भिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. चंद्रशेखर साळवे यांनी केले.