संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
नाटकरवाडी शाळेचा जिल्हास्तरीय उपक्रमशील व नाविन्यपूर्ण शाळा पुरस्काराने गौरव
(दै. दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था)
पैठण : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या संकल्पनेतून, शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, गट शिक्षण अधिकारी श्रीराम केदार, केंद्रप्रमुख दिलिप थोटे यांच्या शिफारशीनुसार जि.प.प्रा. शाळा नाटकरवाडी केंद्र पाटेगाव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर या शाळेतील उपक्रम- सन 2018 ते आजपर्यंत 2 लाख रुपये निधी लोकसभागातून उभारण्यात आला. या निधीतून शाळेला संगणक, शंभर फूट जाळी कंपाऊंड, गेट, शाळेला कमान, मुख्याध्यापक रूम दुरुस्ती, किचन शेड दुरुस्ती, लाईट फिटिंग, फॅन, सुंदर शाळा रंगरंगोटी, विशेष शाळेतील गुणवत्ता -100% मुलांना वाचन, गणितीय क्रिया, वर्गानुसार पाढे, इंग्रजी वाचन व संभाषण, वृक्षारोपण व संवर्धन, शालेय परसबाग, उत्कृष्ट परिपाठ सादरीकरण, प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, वर्षातून चार पालक सभा, शालेय व्यवस्थापनामध्ये पालकांचा प्रत्यक्ष सहभाग व पालकांचे श्रमदान इत्यादी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हास्तरीय नवोपक्रमशील व नाविन्यपूर्ण शाळा हा पुरस्कार देऊन मुख्याध्यापक भागवत फुंदे, शिक्षक प्रवीण अंधारे यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले होते. शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल शाळेच्या वतीने जि.प. प्रशासनाचे आभार मानले.
*प्रतिक्रिया*
माजी विद्यार्थ्यांनी केला मुख्याध्यापकांचा सत्कार
शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार तुषार नाटकर व राजू नाटकर यांनी शिक्षक दिनानिमित्त व जिल्हास्तरीय उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा दोघा शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. याप्रसंगी रघुनाथ नाटकर हेही उपस्थित होते. आमच्या सर्व उपक्रमांना वृत्तपत्रातून सातत्याने प्रसिध्दी देवून सहकार्य करत राहिल्याने अधिक उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
- मुख्याध्यापक, भागवत फुंदे