संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
घुंगर्डे हादगाव : घुंगर्डे हादगाव परिसरात गेल्या काही तासांपासून जिओ नेटवर्क पूर्णतः ठप्प असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कॉल, मेसेज व इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेकांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, शासकीय कागदपत्र अपलोड करणारे नागरिक, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी महत्त्वाचे व्यवहार अडकल्याची तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांना कॉल केला असता अधिकारी कॉल घेत नाहीयेत तसेच जिओकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परिणामी नागरिकांच्या नाराजीला ऊत आला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर जिओविरोधात नाराजी व्यक्त केली असून सेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.