संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
नीलम गायकवाड यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार
-सुमतीबाई गोरे ट्रस्टचे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर
दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी -सुमतीबाई गोरे ट्रस्टचे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून पुणे येथील खुळेवाडीत मनपा शाळा क्रमांक 91 मुलांच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका नीलम विनायक गायकवाड यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असल्याचे संयोजक सोपान बंदावणे व कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर यांनी सांगितले. सामाजिक शैक्षणिक पुस्तकांचा संच, आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील उपक्रमशील शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात येते. प्रस्ताव मागवून पारदर्शक पद्धतीने निवड होत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात हा एक मानाचा पुरस्कार समजण्यात येतो. सामाजिक उत्तरदायित्व,साहित्यिक योगदान, सामाजिक योगदान, समाजासाठी केलेले आर्थिक योगदान, वाढवलेली शैक्षणिक पात्रता, सर्जनशीलता, शैक्षणिक क्षेत्रात इतरांपेक्षा वेगळे काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना व महाराष्ट्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या एका समाजशिक्षकालाही पुरस्कार देण्यात येतो. उपयुक्त अशा सामाजिक शैक्षणिक पुस्तकांचा संच, आकर्षक स्मृतिचिन्ह,शाल, सन्मानपत्र व पूष्पगूच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार समारंभ दत्तात्रय वारे ( वाबळेवाडी झिरो एनर्जी शाळा) यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑगस्ट २०२४ रोजी उद्यान कार्यालय सदाशिव पेठ , पुणे येथे दुपारी ३ वा संपन्न होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सोपान बंदावणे,कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर यांनी दिली. सदर
परीक्षण अनिल आंधळे, रजनीताई धनकवडे, ज्योती मते यांनी केले. तसेच समारंभाची तयारी किरीटी मोरे, प्रभाताई गोगावले,ॲड सुधीर निरफराके,ॲड जाकीर अत्तार, राजेंद्र जठवडेकर, संजय ससे, संगिता गोवळकर, आशालता जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.