संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
प.बंगाल घटनेचा वडगाव को. येथे कँडल मार्च काढत निषेध
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था बजाजनगर -
पश्चिम बंगाल येथील कोलकाता मेडिकल कॉलेज येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ भविष्यदिपनगर वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथे "सायलेंट कॅन्डल मार्च" काढण्यात आला. या मार्च मध्ये दयासंमर्पन युवा फाऊंडेशनच्या महिला, विशेषतः डॉक्टर महिला, युवती व इतर सर्व क्षेत्रातील महिलांनी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला. हा मोर्चा बुद्धमय चौक येथे सुरू होऊन मोर्चाची सांगता गणपती मंदिर भविष्य दिपनगर वडगाव (को.) येथे करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमोल (काका) होर्शीळ यांनी केल. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भाऊ किर्तीकर, उपाध्यक्ष अनुप थोरात, सचिव संजय पठारे, कोषाध्यक्ष सुनील होर्शीळ, नवनाथ गायकवाड,
बाळु तेझाड, दत्ता रावताळे, बाळु होर्शीळ, पंचलोटे साहेब,
सखाराम लांडगे, भैय्या शेंडे,
बाबासाहेब कूंटे, कल्याण होर्शीळ, अभिषेक होर्शीळ, थोरात, रोहीत होर्शीळ, राम सांळुके, राजू रगडे, योगेश काकडे, प्रल्हाद तावरे यांचा सहभाग होता.