Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

पंचाळेश्वर येथे यात्रोत्सव ९ मार्च रोजी होणार विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 06 March 2025 08:37 PM

पंचाळेश्वर येथे  यात्रोत्सव ९ मार्च रोजी होणार विविध कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर शहरासह विविध भागातुन मोफत बसेस सेवा       

भगवंताचा महामस्तकाभिषेक सोहळा होणार


दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर  :

 पंचाळेश्वर येथील श्री १००८ नंदीश्वर जैन अतिशय क्षेत्रात  (दि.९) एकदिवसीय वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचाळेश्वर येथील दिगंबर जैन समाजाचे श्री १००८ नंदिश्वर दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे भारत भर प्रसिध्द आहे. गोदावरी काठेवर असलेले हे क्षेत्र अत्यंत दिव्य असून येणार्‍या भाविकांचे आकर्षण ठरत आहे. हा सोहळा आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव, मयंकसागर महाराज व क्षुल्लक ऐश्श्वर्यसागरजी महाराज यांच्या प्रेरणनेने व  आशीर्वादाने सकाळी ७.३० वा.नंदीश्श्वर विधान,  ११ वाजता  पदमप्रभू भगवंताचा व बावन्न जीनालय भगवंताचा महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. शोभाबाई अजितकुमार सेठी परिवार यांच्या हस्ते ध्वजारोहन  वाजता करâन कार्यकमाची सुरâवात होणार आहे. 
महाप्रसादाचे वाटप अभिषेक सोहळा झाल्यानंतर दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील गुरâभक्त सुंंदरलालजी सुनिलकुमार प्रितम भावेश व्दिवीक, रिदीत, प्रेरीत पाटणी परिवार अधारीवाला यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप होणार आहे. यावेळी डॉ.सुगंनचंद केवलचंद कासलीवाल उमापुर वाला आडुळ अतिथी भवनचे भुमीपुजन श्रीमती.मंगलाबाई डॉ.सुगनचंद कासलीवाल, संजयकुमार संदीपकुमार कासलीवाल परिवार कासलीवाल कंन्स्ट्रक्शन संभाजीनगर यांच्या हस्ते होणार आहे.  यावेळी नवनिर्माणाधीन वास्तुचे भुमीपुजन सोहळा प्रथम मजल्याचे श्रीमती बदामबाई पानाचंद बाकलीवाल, दुसरा मजला कचरâलाल कपुरचंद पाटणी, आहार कक्ष श्रीमती.सुजाता शहा, खोलीसाठी माणिकचंदजी महावीर प्रकाश राजेंद्र सेठी परिवार, शिलादेवी झुंबरलाल अल्केश शैलेश रावका परिवार, श्रीमती.कुसुमबाई नेमीचंदजी सौ.निर्मलादेवी संजय, सोनल, अजित, अपेक्षा, श्रेयांश कासलीवाल परिवार, जयमाला महावीर पारस कुणाल प्रशांत प्रविण बडजाते परिवार, प्रविण फुलचंद काला परिवार, अरâणा हिरालालजी ज्योती सचिन रâपाली समेल अभिषेक ओम धोदलकर परिवार आदींच्या हस्ते भुमिपुजन सोहळा संपन्न होणार आहे व यांचे सहाकार्य मिळाले आहे. संपुर्ण अभिषेक हा पंडीत अमोल जैन व शिखरचंद जैन यांच्या साग्रसंगीतामध्ये संपन्न होणार आहे. कार्यकमाचे सुत्रसंचालन छत्रपती संभाजीनगर येथील प्रविण लोहाडे हे करणार आहेत. कार्यकमाच्या पंचरंगी पत्रिकेसाठी अजित राजेंद्र संजय सेठी परिवार पाचोडवाले यांचे सहकार्य मिळाले आहे. पंचक्रोशीतील जैन भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गौतमचंद काला ऊपाध्यक्ष ऋशब गंगवाल सूहास चूडीवाल  सचिव भाऊसाहेब बाकलीवाल  कोषाध्यक्ष संजय सेठी  सहसचिव विजय पापडीवाल कैलास खोबरे  विश्वस्त  प्रकश सेठी  विलास पहाडे  भगवानदास काला  अशोक कासलीवाल  राजेद्र काला  संतोष अजमेरा हिरालाल धोदलकर  सदीप कासलीवाल सुनिल पाटणी  व आयोजक समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र  अजमेरा  पियूष कासलीवाल  यानी दिली  या महोसवासाठी  छत्रपती संभाजीनगर शहराचा विविध  ठीकानाहून  सकाळी ६ वाजता  राजाबजार, अरिहंत नगर, बालाजीनगर, बजाजनगर, पंढरपुर, वाळुज, गेवराई, पाचोड, श्रीरामपुर  मोफत बस ठेवली आहे

या बसेस साठी सुनिलकुमार, मनोजकुमार, सुशांतकुमार, लक्ष कुमार, छाबडा परिवार तोंडापुर, राजेद्रकुमार, नरेंद्रकुमार, महेंद्र, मयंक, पाटणी परिवार अंधारीवाला, आशादेवी, संजयकुमार रणदिवे गुळजकर, पारस सुभाषचंद अजमेरा, पंकज भगवानदास काला, निलेश, सागर, यश, हर्षे पांडे परिवार श्रीरामपुरवाला आदींचे मोफत बसेससाठी सहकार्य लाभले आहे. 
या महोत्सवासाठी आ.विजयराजे पंडीत, बदामराव पंडीत, लक्ष्मणराव पवार, भाउâसाहेब नाटकर, विकास शेळके, मदनराव कोटी आदी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे. 
यात्रा महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, शिर्डी, श्रीरामपुर, मालेगांव, वाळुज, जालना, दुर्ग, वैजापुर, नागपुर, अंबड, विहामांडवा, आदी ठिकाणाहुन भक्तगण मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे.