Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

पाचोड तै पैठण रस्त्यावर अपघात, पती ठार पत्नी जखमी

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

पाचोड तै पैठण रस्त्यावर अपघात, पती ठार पत्नी जखमी

दै.दखनी स्वराज्य / सुरेश गोर्डे


बालानगर : पाचोड - पैठण राज्य महामार्गावर दिनांक 21 शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच - 46 एफ 5974 ने मोटारसायकल स्वारास जोराची धडक दिल्यामुळे मोटारसायकल क्रमांक एमएच 20 डीआर 0868 वरील विकास बाबासाहेब शरणागत रा.बालानगर, वय 25 हा जागीच ठार झाला तर त्याची पत्नी अश्विनी शरणागत वय 21 या गंभीर जखमी झाल्यामूळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यात पुढील ऊपचारसाठी हलविण्यात आले. विकास बा.बाबासाहेब शरणागत याना ट्रकने जवळ जवळ 100 फुट फरपटत नेल्यामुळे त्याचे शरीर छिन्न विच्छन्न अवस्थेत आढळले. रस्त्यावर शरीराच्या मासाचे गोळे पडलेले होते. ही घटना वट सावित्रीच्या पौर्णीमेलाच घटना घडल्यामुळे बालानगर सह परीसरात हळहळ व दुखवटा पाळण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मा.सभापती विलास पा.भुमरे यांनी जखमी रुग्णास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यासाठी तातडीने अंबुलन्स ऊपलब्ध करुन दिली. पाचोड - पैठण महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे वाढते प्रमाण पाहता शासनामार्फत अंबुलन्स सेवा पाचोड, दावरवाडी या ठीकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ऊपलब्ध कराव्यात अशी मागणी परीसरातील नागरीक करीत आहेत. या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलिस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. विकास शरणागत याच्या परिवारास शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी होत आहे.