संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जागतिक महिला दिनाचे औचित्याने तसेच बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर व पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन आज दि 6/3/ 2025 रोजी करण्यात आले होते.
मा.प्रवीण पवार पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजी नगर शहर मा. डॉ. विनायक कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी दुचाकी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले आहे.
बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला असून यामध्ये दोन्ही दलातील 200 पेक्षा अधिक महिला अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला आहे. मिल कॉर्नर येथून या रॅलीला सुरुवात होऊन बाबा पेट्रोल पंप जालना रोड, चिस्तीया चौक, बजरंग चौक, टीव्ही सेंटर, मार्गे ही रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला आहे.