संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पांढरी' गावात जनावरांची लसीकरण मोहीम
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ खोडेगाव छत्रपती संभाजीनगर व नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने 'पांढरी' या गावामध्ये लसीकरण शिबिर घेतले.यात लाळ्या खुरकूत व फऱ्या या रोगाची लस 30 ते 40 जनावरांना टोचण्यात आली.पशुवैद्यक डॉ.अशोक कर्डिले व पशुवैद्यक सहाय्यक डॉ.विलास राठोड यांनी लसीकरण केले.डॉ.कर्डिले साहेबांनी लाळ्या खुरकूत रोगाविषयी माहिती दिली व या रोगाचा दुधाच्या उत्पादनावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच बाळासाहेब मोरे,अण्णासाहेब मोरे,विकास छिद्रे,रसूल शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळेस दिसून आला.त्यांना आलेल्या विविध प्रश्नांचा पशुवैद्यकीय चिकित्सकांकडून व कृषीदूतांकडून निराकरण करण्यात आले.
हा प्रयोग करताना एम.जी.एम ना.क.कृ. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एम.मस्के सर,ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव समन्वयक डॉ.जी.आर.गोपालसर,कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.ए.शेळके सर व पशुसंवर्धन आणि दुघ्धशास्त्र विभागाच्या तज्ञ डॉ.बी. एन.थोरात मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.