संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
बालानगर : पैठण तालुक्यातील पारुंडी येथे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पारुंडी ह्यूमाना पीपल्स टू पीपल इंडिया संस्था अंतर्गत मानसिंग नाईक विद्यालय व कनिष्ठ महावद्यालय यांच्या सहभागातून उच्चरक्तदाब या आजाराची माहिती व याबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली. उपस्थित नागरिकांना या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यक्रमास ह्युमाना कर्मचारी प्रोजेक्ट लीडर शंकर लाल गुर्जर, हेल्थ एक्सलेटर मनिषा खवाटे, प्रीती साळवे, आहार तज्ञ मेघा विवेक ताकभाते, आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉ संदीप चव्हाण, आशा वर्कर शोभा अडगळ, शालेय कर्मचारी शिक्षक प्रा. एस. जी. खदगावकर, एम. वी. खेडकर व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामसेवक वि. एस. वानखेडे, सरपंच दत्तू दौंड, उपसरपंच झाकीर शेख, नितीन बाबासाहेब निसर्गे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.